अजित भालचंद्र आगरकर (डिसेंबर ४, इ.स. १९७७:मुंबई - )हा भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे
पहिल्या काही षटकात हमखास विकेट मिळवून देणा-या भारतीय संघात आलेल्या ३० वर्षीय अजित आगरकरचा काही नेम नाही . स्टार चांगले असतील तर तो महत्त्वाच्या विकेटस् काढून देईल , मोक्याच्या क्षणी बॅटला धार लावून धावांची बरसातही करेल . पण स्टार खराब असतील तर ... काही विचारु नका . आपल्या तेज आणि धारदार बॉलिंगच्या जोरावर वन डेमध्ये सर्वात जलद ५० विकेटस् काढण्याचा विक्रम भारतीय गोलंदाजांमध्ये आगरकरच्या नावावर आहे . तसाच ऑस्ट्रेलियात लागोपाठ सात कसोटी सामन्यांमध्ये शून्यावर आऊट होण्याचा पराक्रमही त्यानेच गाजवला आहे . २१ बॉलमध्ये हाफ सेन्चुरी झळकावण्याची आणि लॉर्डसवर सेन्चुरी ठोकण्याची किमयाही तोच करु शकतो . त्यामुळे असा खेळाडू संघात असणे ही जमेची बाजू आहे..
अजित आगरकर
Posted by
परेश बा. म्हात्रे
, Thursday, September 17, 2009 at 2:06 AM, in
Labels:
अजित आगरकर,
खेळाडू
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment