दि ग्रेट मराठा
this site the web

लता मंगेशकर



लता मंगेशकर ( जन्म: सप्टेंबर २८, १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. लता-दीदीच्या कारकीर्दीची सुरूवात १९४२ मध्ये सुरू झाली आणी सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, इतर वीस वर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता-दीदींचा परिवार संगीतासाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या भावंडांमध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणी ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर समाविष्ट आहेत. लता-दीदींचे वडील दिनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.
भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्‍या गायक-गायिकांमध्ये लता-दीदींचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे.
लता-दीदींचे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद आहे.
लता मंगेशकर हा एक चमत्कार आहे. त्यांना आवाजाची दैवी देण आहे. त्यांच्या मधुर आवाजातील अंगाई गीत ऐकून चिमुरडी झोपी जातात. तरूणांना त्यांच्या प्रीती गीतांची मोहिनी पडते. मध्यमवयीनांना त्यांचा काळ आठवतो आणि वृद्धांना त्यांच्या भावनांची अभिव्यक्ती होतेय असे वाटते. लता नावाचा स्वर म्हणूनच अपार आणि अनंत आहे. चंद्र सूर्य असेपर्यंत हा स्वर कायम राहील असे वाटते. लता दिदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याविषयीच्या काही वेगळ्या बाबी खास तुमच्यासाठी. 


लता दिदीचे गाणे हे ईश्वराच्या पूजेसारखे मानतात. म्हणूनच गाण्याचे रेकॉर्डींगसुद्धा त्या अनवाणीच करतात. तेथे चप्पल घालून त्या अजिबात जात नाहीत.
त्यांच्या वडीलांनी भेट म्हणून दिलेला तंबोरा त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. 
दिदींना छायाचित्रणाचाही छंद आहे. परदेशात त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरले होते. 
  1984 मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल आणि व्हिक्टोरीया हॉलमधील कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने संस्मरणीय आहे. कारण या कार्यक्रमासाठी जमलेल्या पाच हजारांच्या श्रोतृवृंदाने सलग दहा मिनिटे टाळ्या वाजविल्या होत्या.      
खेळांमध्ये त्यांना सर्वात जास्त क्रिकेटचा खेळ आवडतो. भारताचा एखाद्या बलाढ्य संघाशी क्रिकेट सामना असेल तर त्या दिवशी सर्व कामे सोडून त्या सामना पाहतात. 
कागदावर काहीही लिहिण्यापूर्वी त्या 'श्रीकृष्ण' असे नाव लिहूनच लिहिण्यास सुरवात करतात. 
'आएगा आनेवाला' या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी त्यांना बावीस वेळा रिटेक द्यावा लागला होता. 
दिदींना जेवणात कोल्हापुरी मटण आणि मच्छी फ्राय खूप आवडते. 
लिओ टॉलस्टॉय, खलिल जिब्रान या लेखकांचे साहित्य त्यांना खूप आवडते. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी आणि गीतादेखील त्यांना आवडते. 


कुंदनलाल सहगल आणि नूरजहाँ लता दीदीचे सर्वात जास्त आवडते गायक-गायिका आहेत. शास्त्रीय गायकांमध्ये पंडीत रवीशंकर, जसराज, भीमसेन जोशी, गुलाम अली आणि अली अकबर खान हे त्यांचे आवडते गायक आहेत. गुरूदत्त, सत्यजीत रे, यश चोप्रा, आणि बिमल रॉय यांचे चित्रपट त्यांना खूप आवडतात. रोज झोपण्यापूर्वी त्या देवाचे नामस्मरण करतात. दीपावली त्यांचा सर्वांत आवडता सण आहे. 


1984 मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉल आणि व्हिक्टोरीया हॉलमधील कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने संस्मरणीय आहे. कारण या कार्यक्रमासाठी जमलेल्या पाच हजारांच्या श्रोतृवृंदाने सलग दहा मिनिटे टाळ्या वाजविल्या होत्या.


भारतीय इतिहास आणि संस्कृतीतील कृष्ण, मीरा, विवेकानंद आणि अरविंद घोष या व्यक्तिमत्वांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. 
पडोसन, गॉन विथ द विंड आणि टायटॅनिक हे चित्रपट त्यांच्या आवडीचे आहेत. 
दुसर्‍यावर लगेच विश्वास ठेवणे हा त्यांच्या स्वभावाचा कमकुवत भाग आहे, असे त्यांना वाटते. 
पहिल्यांदा स्टेजवर गाणे गायले, त्यावेळी त्यांना पंचवीस रूपये मिळाले होते. ती त्यांची पहिली कमाई होती. पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात त्यांना पहिल्यांदा तीनशे रूपये मिळाले होते. 


उस्ताद अमान खाँ भेंडी बाजारवाले आणि पंडीत नरेंद्र शर्मा यांना दिदी आपले संगीत गुरू मानतात. श्रीकृष्ण शर्मा त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. महाशिवरात्र, श्रावणी सोमवाराशिवाय त्या गुरूवारीही उपास करतात. लता दिदींनी आपले पहिले चित्रपट गीत 1942 मध्ये 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी गायले होते. पण काही कारणास्तव हे गाणे चित्रपटात नव्हते. त्यानंतर 1942 मध्ये 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटात त्यांचा आवाज प्रथमच ऐकायला मिळाला. 


1947 मध्ये 'आपकी सेवा' या हिंदी चित्रपटात दिंदीनी पहिल्यांदा हिंदी गाणे गायले. 'पा लागू कर जोरी रे' हे त्या गाण्याचे बोल होते. लता दिदींनी पहिल्यांदा नायिका मुन्वर सुलतानासाठी पार्श्वगायन केले.

0 comments:

Post a Comment

 

W3C Validations

Cum sociis natoque penatibus et magnis dis parturient montes, nascetur ridiculus mus. Morbi dapibus dolor sit amet metus suscipit iaculis. Quisque at nulla eu elit adipiscing tempor.

Usage Policies